वाचू आनंदे, अभिनव मैफल

के. ई. टी. स्कूल्स ऑफ मॅनेजमेंट ग्रंथालयाने “एका पुस्तक वेड्याची गोष्ट” हे व्याख्यान ठाणे येथील सिग्नल स्कूल च्या विद्यार्थ्यांसाठी ३ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केले होते. या व्याख्यानाचे व्याख्यानकर्ते होते,सी ए अमृत देशमुख त्यांना (Booklet Guy) म्हणून ओळखले जाते.

या व्याख्यानाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांशी छान संवाद साधला. व्याख्यानामधून त्यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच परीक्षेमध्ये उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी सोप्या पद्धती शिकवल्या. मुलांनी त्यांच्या व्याख्यानाचा मनसोक्त आनंद घेतला. यावेळी जयश्री मावळे (KET ग्रंथपाल) यांनी काही गोष्टींची पुस्तके ही सिग्नल स्कूल ला भेट म्हणून दिली.